Blogs & Articles

  1. home
  2. blogs

माझ्यावर तुम्ही जितके प्रेम करता तसेच प्रेम अजून सहजयोगात न आलेल्या लोकांबद्दल तुम्हाला वाटले पाहिजे.त्यांना आत्मसाक्षात्कार देण्याची तळमळ तुमच्यात असली पाहिजे.सतत लोकांना सहजयोग सांगत राहिला पाहिजे.सहजयोगाच्या प्रसारासाठी अंग झटकुन कार्य करणे या सारखी समाधान कारक व आनंददायक गोष्ट नाही.नविन वर्ष सुरु होताना काहीतरी नविन संकल्पना निश्चित करण्याची प्रथा आहे,म्हणुन आज तूम्ही प्रत्येकाने काय करणार याचा निश्चय करा,नुसती माझी पूजा करण्याचा किंवा पूजा कार्यक्रमासाठी काम करण्याचा कोणताही फायदा नाही.मोठ-मोठया संत-पुरुषांनाही जे जमले नाही,पण तुम्हाला ती शक्ती मिळालेली आहे, म्हणून सहजयोगाचा प्रसार करण्याचा व जास्तीत-जास्त लोकांना सहजयोगातून जागृती देण्याचा ठाम निश्चय करा.असे सहजयोगाचे कार्य तुम्ही केलेत तर माझ्यावर फार मोठे उपकार होणार आहेत व जगभर सहजयोग पसरविण्याचे माझे स्वप्न साकार होणार आहे.

              श्रीमाताजी

कळवा पूजा :31 डिसेंबर 2001